आ. गोपीचंद पडळकर – प्रस्थापितांना धडकी भरवणारा निर्भीड नेता

gopichand-mla

धनगर समाजाचा आवाज असलेले गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील राजकारणात एक परखड, स्पष्टवक्ते आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ST आरक्षणासाठी अखंड संघर्ष केला असून ते समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवत आले आहेत.

Facebook Instagram Twitter

गोपीचंद पडळकर

वर्तमान पद: आमदार, जत विधानसभा (भाजप)

पक्ष: भारतीय जनता पक्ष

समाज: धनगर

धनगर समाजासाठी लढा, निर्भीड वक्तव्यं, 2024 विधानसभा विजय

राजकीय कारकिर्दीचा प्रवास

गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीस महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून सुरुवात केली होती. जानकर हे धनगर समाजातील असल्यामुळे, त्यांनी धनगर आरक्षणासाठी लढा दिला आणि त्याला पडळकरांनी बळ दिलं.

त्यांनी पहिली निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली. त्यानंतर 2014 साली भाजपमध्ये प्रवेश करत पुन्हा तिथूनच निवडणूक लढवली. वादानंतर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून लढले. नंतर परत भाजपमध्ये येत त्यांनी बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली.

2024 ची ऐतिहासिक निवडणूक विजय

2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. हे त्यांचं पहिलं मोठं यश असून, ते धनगर समाजाचं सशक्त प्रतिनिधित्व करत आहेत.

लेखन, अभिनय आणि सामाजिक कार्य

पडळकर हे केवळ राजकारणी नाहीत तर लेखक, सिने निर्माता आणि अभिनेते सुद्धा आहेत. 2019 मध्ये त्यांनी ‘धुमस’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. ते समाजसुधारणेच्या कार्यात सक्रीय आहेत.

आ. गोपीचंद पडळकर – प्रस्थापितांना धडकी भरवणारा निर्भीड नेता

आता समाजाचे प्रतिनिधित्व करत असतानाच, गोपीचंद पडळकर हे बहुजन समाजाचे सशक्त नेता तसेच हिंदू संस्कृती आणि धर्म जपणारे नेता म्हणून उभे आहेत. जनतेशी घट्ट जोडलेले, अगदी कधीही कॉल उचलून प्रत्येक व्यक्तीला मदत करणारे हे नेता. त्यांच्या या कटिबद्धतेमुळे धनगर समाज आज आनंदी आहे. तसेच, लोकांमधून गोपीचंद पडळकर हे मंत्री पदावर यावेत अशी जनभावना प्रचंड आहे.

तुम्हालाही जर गोपीचंद पडळकर यांच्या या प्रेरणादायी कार्याचा आणि धडाकेबाज नेतृत्वाचा अभिमान वाटत असेल, तर कृपया ही लिंक तुमच्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा आणि या संदेशाला अधिक लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृतीत सहभागी व्हा. तुमच्या छोटय़ा प्रयत्नाने मोठा फरक पडू शकतो!

आ.दत्तात्रय विठोबा भरणे : एक प्रभावी आणि जनतेशी जोडलेला नेता आ.दत्तात्रय विठोबा भरणे, माहिती येथे वाचा

आ.डॉ. बाबासाहेब देशमुख – संघर्ष, सेवा आणि साधेपणाचा वारसा डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या योगदानाची माहिती येथे वाचा

Posted on August 2, 2025 | Category: राजकीय नेतृत्व

2 Comments on “आ. गोपीचंद पडळकर – प्रस्थापितांना धडकी भरवणारा निर्भीड नेता”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *