कोळेकर परिवार आणि यशवंत ब्रिगेडची अखंड सेवा

सामाजिक बांधिलकीचा वसा! यशवंत ब्रिगेडकडून वर्षभर गरजूंना मदतीचा हात: दिवाळी फराळ वाटपापासून वृक्षारोपणापर्यंत

दिवाळी फराळ वाटप

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोळेकर परिवार व यशवंत ब्रिगेडने आपली सामाजिक बांधिलकी मोठ्या उत्साहाने जपली आहे. दरवर्षी दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप व कपड्यांचे वाटप या माध्यमातून करण्यात येते.

यावर्षीही ज्यांची दिवाळी गोड झालेली नाही, अशा झोपडपट्टीतील मुलांना फराळाचे वाटप व कपड्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वीटभट्टी वरील कामगारांची मुले, ऊसतोड कामगारांची मुले इत्यादींनाही फराळाचे व कपड्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, मेंढपाळांच्या तळावर व बग्यात जाऊन त्यांना फळांचे वाटप करण्यात आले.

यशवंत ब्रिगेड संघटना सदैव गोरगरिबांना मदतीचा हात देण्याचा आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत असते. केवळ सणासुदीलाच नव्हे, तर शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अनेक विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून शालेय साहित्य व शैक्षणिक गणवेश वाटप करण्यात येते. यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळतो. त्याचबरोबर जेथे-जेथे माता-भगिनींच्यावर अन्याय-अत्याचार होतो तेथे-तेथे यशवंत ब्रिगेड संघटना सदैव धावून जात असते आणि त्यांना कायदेशीर मदतही पुरवते. तसेच ही संघटना सदैव भटक्या आणि विमुक्त मेंढपाळांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी अग्रक्रमाने प्रयत्न करत असते. या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेले आहेत आणि समाजात महत्त्वाचे योगदान देत आहेत.

यशवंत ब्रिगेडचा व्यापक सामाजिक सहभाग

यशवंत ब्रिगेड संघटना सदैव गोरगरिबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असते. संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम नियमितपणे राबवले जातात:

  • शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अनेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शैक्षणिक गणवेश वाटप.
  • माता-भगिनींच्यावर अन्याय-अत्याचार झाल्यास सदैव मदतीसाठी धावून जाणे.
  • मेंढपाळांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न.
  • आजपर्यंत अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले, ज्यातून अनेक विद्यार्थी यशस्वी झाले.
  • पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या अपेक्षेने प्रत्येक वर्षी दहा हजार वृक्षरोपण (वृक्षसंवर्धन).
  • गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा यशस्वींचा दरवर्षी सन्मान.
दिवाळी फराळ वाटप

संकटकाळातील विशेष भूमिका

या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना तसेच पूरग्रस्तांना या संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आलेले आहे. खास करून कोरोनाच्या काळामध्ये या संघटनेने विशेष भूमिका निभावलेली आपणास पाहावयास मिळते.

“समाजाप्रती आम्ही सदैव चांगले काम करत राहू.”

संस्थापक अध्यक्ष यांच्याबद्दल अधिक माहिती

प्रा. डॉ. संतोष कोळेकर यांचे प्रोफाइल पहा

Posted on October 29, 2025 | Category: यशोगाथा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *