ॲस्टर (Aster flower) वेगवेगळे आकार, रंग आणि टिकाऊपणामुळे ॲस्टर फुलांना मोठी मागणी आहे.
त्याचबरोबर, ही फुले अनेक प्रसंगांसाठी उपयुक्त ठरतात.
ही फुले कट फ्लॉवर आणि सुकवलेली फुले म्हणून वापरली जातात, मुळे त्यांचा उपयोग घरगुती आणि व्यवसायिक ठिकाणी वाढलेला आहे.
Aster flowers are highly popular due to their wide variety of shapes, bright colors, and long-lasting freshness.
Furthermore, their eye-catching appearance makes them suitable for various uses.
ॲस्टर Aster flower पिकाला पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवते. भारी जमिनीत वाढ जोमदार होत असली, तरी फुले कमी लागतात, तर हलक्या वरकस जमिनीत पिकाची वाढ खुंटते व निकृष्ट दर्जाची फुले येतात. तसेच चुनखडीच्या व दलदलीच्या जमिनी या पिकास अयोग्य असतात.
Aster flower Extreme cold, heat, and heavy rains are harmful…
ॲस्टर लागवडीसाठी जमीन खोल नांगरून, वखरून आणि भुसभुशीत करावी. एकरी १० टन शेणखत मिसळावी.
सरींचे अंतर ६० सेंमी. असावे, तर दोन्हीकडून ३० सेंमी. अंतरावर रोपे लावावीत.
सपाट वाफ्यावर लागवड करताना ३० x ३० सेंमी. अंतरावर रोपे लावावीत.
लागवडीचे अंतर हंगाम, जात आणि जमिनीनुसार वेगळे असू शकते. जून-जुलैमध्ये खरीप, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रब्बी आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हाळी लागवड होते. बीजोत्पादनासाठी रब्बी हंगाम सर्वोत्तम आहे.
बियाणे वाफ्यावर १०-१२ सेंमी. अंतरावर पेरावे. बिया १ सेंमी.पेक्षा खोल नाही पेराव्यात. ३०-४० दिवसांत रोप तयार होतात.
For aster planting, the land must be deeply plowed, loosened, and enriched with 10 tons of manure per acre.
Rows should be spaced 60 cm apart, with plants 30 cm apart on both sides. On flat beds, plant seedlings at 30 x 30 cm spacing.
Planting distance varies with season, variety, and soil type.
Kharif planting is done in June-July, Rabi in October-November, and summer in February-March.
Rabi season is ideal for seed production. Sow seeds on beds 10-12 cm apart and not deeper than 1 cm. Seedlings are ready for transplanting in 30-40 days.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ॲस्टरच्या फुले गणेश व्हाईट, पिंक, परपल आणि व्हायोलेट यांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.
तसेच, भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बंगलोरने अर्का कामिनी, पौर्णिमा, शशांक आणि व्हायोलेट कुशन या जाती तयार केल्या आहेत. याशिवाय, ड्वार्फ क्वीन, अमेरिकन ब्युटी, स्टार डस्ट आणि सुपर प्रिन्सेस या परदेशी जातीही लागवडीत येतात.
बाजारातील मागणी पाहून योग्य जातीची निवड करावी.
Mahatma Phule Agricultural University has developed improved aster varieties like Phule Ganesh White, Pink, Purple, and Violet.
Additionally, the Indian Institute of Horticultural Research, Bangalore, has introduced Arka Kamini, Arka Pournima, Arka Shashank, and Arka Violet Cushion varieties.
Moreover, foreign varieties like Dwarf Queen, American Beauty, Star Dust, and Super Princess are also cultivated. Choose varieties based on market demand.
लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार हेक्टरला ९० किग्रॅ नत्र, १०० किग्रॅ स्फुरद आणि १०० किग्रॅ पालाश मिसळावे.
लागवडीनंतर २०-२५ दिवसांनी नत्राचा दुसरा हप्ता ५० किग्रॅ प्रति हेक्टर द्यावा.
पाणी व्यवस्थापन जमिनीनुसार आणि हंगामानुसार करणे गरजेचे आहे.
ॲस्टरच्या मुळ्या जमिनीत खोल जात नाहीत, त्यामुळे मुळाजवळील माती ओली ठेवावी.
साधारणतः ८-१० दिवसांनी पाणी द्यावे. पण फुलांचा बहार सुरू झाल्यानंतर पाण्याचा ताण टाळावा, अन्यथा उत्पादनावर परिणाम होतो.
Before planting, mix 90 kg nitrogen, 100 kg phosphorus, and 100 kg potash per hectare based on soil testing.
Apply the second dose of nitrogen, 50 kg per hectare, 20-25 days after planting. Water management should depend on soil type and season.
Aster roots do not go deep, so keep soil near roots moist. Usually, water every 8-10 days. However, once flowering starts, avoid water stress to prevent yield loss.
लागवडीपासून साधारण २.५ ते ३ महिन्यांत फुलं काढणीस तयार होतात.
ॲस्टरची फुले पूर्ण उमलल्यावर काढणी करतात.
लांब दांड्यासाठी ५-७ फुले उमलल्यावर ७-१० सेंमी लांब दांड्यासह काढणी करतात.
साधारण १० दांड्यांची जुडी बांधून बाजारात पाठवितात.
एकरी सुमारे ४०,००० जुड्यांचे उत्पादन होते किंवा ८-१० टन सुट्या फुलांचे उत्पादन मिळते.
Flowers are ready for harvest about 2.5 to 3 months after planting.
Harvest is done when asters are fully bloomed.
For longer stems, pick flowers with 7-10 cm stem after 5-7 flowers bloom on the plant.
Usually, bunches of 10 stems are tied and sent to the market.
Approximately 40,000 bunches or 8-10 tons of dried flowers are produced per acre.
ॲस्टरवर मावा, तुडतुडे आणि फुले व कळ्या पोखरणाऱ्या अळ्या यांचा प्रादुर्भाव होतो.
या किडींसाठी डायमिथोएट १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रोगांमध्ये मर व पानावरील ठिपके मुख्य आहेत.
मर रोगासाठी निचर असलेली जमीन निवडावी.
तसेच, बोर्डो मिश्रण १% किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी.
Aster plants are affected by aphids, thrips, and flower and bud-boring caterpillars.
Spray with 1 ml of Dimethoate per liter of water to control these pests.
Diseases include wilt and leaf spot.
For wilt control, select well-drained soil for planting.
Also, spray 1% Bordeaux mixture or 1 gram Carbendazim per liter of water.