गुलाब लागवड: जाती, खत, कीड नियंत्रण व उत्पन्न मार्गदर्शक
गुलाब लागवड
📑 अनुक्रमणिका
- गुलाबाच्या जाती
- माती व हवामान
- लागवड
- पाणी व्यवस्थापन
- खत व्यवस्थापन
- सूक्ष्म अन्नद्रव्ये
- जैवखते
- छाटणी
- वाढ नियंत्रक
- किड व रोग नियंत्रण
- कालावधी
- फुलोरा व तोडणी
- उत्पन्न
🌱 गुलाबाच्या जाती
डच, ग्लॅडिएटर, बोरडो व बटन गुलाब या जाती शेतकरी गुलाब लागवड प्रामुख्याने लावतात.
🌍 माती व हवामान
गुलाब लागवड साठी सुपीक, चांगली निचरा होणारी वालुकामय गाळमाती (pH 6-7) योग्य असते. किमान ६ तास सूर्यप्रकाश आवश्यक. दिवसाचे तापमान 26°C आणि रात्रीचे 15°C उत्तम असते.
🌿 लागवड
प्रामुख्याने कलम केलेली रोपे वापरतात. लागवडीतील अंतर जातीवर अवलंबून:
- डच गुलाब — हरितगृह लागवडीसाठी
- ग्लॅडिएटर, बोरडो, बटन — मोकळ्या शेतासाठी
💧 पाणी व्यवस्थापन
सुरुवातीला दररोज 10-15 मिनिटे पाणी. नंतर दिवसातून दोनदा. हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार बदल. खारट पाणी टाळावे.
🌾 खत व्यवस्थापन
- सुरुवातीस वाढीसाठी – 12:61:00, 19:19:00
- फुलधारणेनंतर – 0:52:34, 0:0:50, 13:40:13
⚗️ सूक्ष्म अन्नद्रव्ये
- 1g/L चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स फवारणी
- मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन – ड्रिपद्वारे
🧪 जैवखते
आझोस्पिरिलम व फॉस्फोबॅक्टेरिया महिन्यातून एकदा ड्रिपद्वारे द्यावेत.
✂️ छाटणी
ऑक्टोबर ते डिसेंबर छाटणीस योग्य. रोगट, कमकुवत, गुंतागुंतीच्या फांद्या काढाव्यात. छाटलेल्या भागावर बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड वापरावा.
🌸 वाढ नियंत्रक
छाटणीनंतर ३० दिवसांनी GA₃ ची फवारणी करावी. फुलधारणा वाढते.
🛡️ किड व रोग नियंत्रण
🪲 प्रमुख किडी
- गुलाब भुंगा – क्विनालफॉस 2 ml/L
- व्हाईट ग्रब – मेटारिझियम 1kg/acre
- मेलीबग – मेथिल पॅराथिऑन 2ml/L
- रेड स्केल – मॅलाथिऑन 2ml/L किंवा फिश ऑईल सोप
- त्रिप्स/मावा – डायमेथोएट, इमिडाक्लोप्रिड, स्पायनोसॅड
🦠 रोग
- ब्लॅक स्पॉट: कार्बेन्डाझिम, अॅझॉक्सीस्ट्रोबिन
- पावडरी मिल्ड्यू: वेटेबल सल्फर, मायक्लोब्युटानिल
- बोट्रायटिस: क्लोरोथॅलोनील, मॅन्कोझेब
- क्राउन गॉल: बाधित झाडे नष्ट करावीत, ५ वर्षे त्या ठिकाणी गुलाब न लावणे
📅 कालावधी
फुलधारणा पहिल्या वर्षी सुरू होते. दुसऱ्या वर्षापासून उत्पादन चांगले मिळते.
🌼 फुलधारणा व तोडणी
लागवडीनंतर ९० दिवसांनी फुलायला सुरुवात होते. सकाळी लवकर पूर्ण उमलेली फुले तोडावीत.
📊 उत्पन्न
उत्पादन दर एकर दरवर्षी सुमारे ३ ते ४ लाख फुले मिळतात. गुलाबाचा दर बाजारभावावर अवलंबून असतो. बाजारात मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे दर बदलतात. त्यामुळे दर ठरवताना सद्य बाजारभाव आणि स्थानिक गरजा लक्षात घेणे आवश्यक असते.
| वर्ष | सरासरी फुले (प्रति एकर) |
|---|---|
| पहिले | 1.5 – 2 लाख |
| दुसरे व पुढे | 3 – 4 लाख |
📞 गुलाब लागवडी संबंधित काही प्रश्न / शंका असल्यास…
आपल्या सर्व शंका व प्रश्नांसाठी अनुभवी व्यक्तीसोबत मोफत चर्चा करू शकता.
ही माहिती एका अनुभवी शेतकऱ्यांकडून गोळा केलेली आहे, ज्यांना या क्षेत्रात सुमारे ७-८ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे ही माहिती प्रामाणिक आणि उपयुक्त आहे.
Contact Us : +91 7709060722
👨🌾 अमित कोळेकर
10+ वर्षांचा अनुभव
🌸 Floriculturist | Exotic Vegetables & Cut Flowers Grower
🌹 Specialization: डच Rose, Gerbera & Premium Blooms
🌱 Passionate about Floriculture & शाश्वत Farming
📩 जर तुम्हाला वरील क्षेत्रातील मार्गदर्शन, बाजारभाव, फायदे-तोटे याबद्दल खात्रीशीर फ्री कन्सल्टेशन हवे असेल तर संपर्क करा 👇
💬 WhatsApp वर संपर्क करा
4 Comments on “गुलाब लागवड: जाती, खत, कीड नियंत्रण व उत्पन्न मार्गदर्शक”