स्पर्धा परीक्षेची(UPSC) तयारी करणाऱ्या धनगर समाजातील युवकांना आता मासिक 13,000 रुपये अनुदान!
UPSC मोफत प्रशिक्षण योजना 2025-26 (भटक्या जमाती – NT-C)
Source: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर
योजनेची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती संस्थेकडून भटक्या जमाती – क (NT-C) प्रवर्गातील उमेदवारांसाठी UPSC परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण सुरु केले आहे. या योजनेंतर्गत निवडक उमेदवारांना UPSC पूर्व, मुख्य व मुलाखत परीक्षेची तयारी, हॉस्टेल, अभ्यास साहित्य व भत्त्याचा लाभ मिळेल.
पात्रता
- महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- भटक्या जमाती (NT-C) प्रवर्गातील उमेदवार
- नॉन-क्रीमीलेयर गटातील असावा
- शासनाने ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेत असावा
- पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण
- इतर शासकीय UPSC प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा
- निवड गुणवत्ता यादीनुसार
योजनेचे फायदे
- UPSC पूर्व, मुख्य, व मुलाखत परीक्षेसाठी संपूर्ण मोफत प्रशिक्षण
- तज्ज्ञ मार्गदर्शन, अधिव्याख्याने, ग्रंथालय, क्लासेस
- फ्री हॉस्टेल व अभ्यास साहित्य
- निवासी विद्यार्थ्यांना रु. 13,000/- (75% उपस्थिती आवश्यक)
आरक्षण व टक्केवारी
| आरक्षण प्रवर्ग | टक्केवारी |
|---|---|
| इतर मागास वर्ग (OBC) | 59% |
| भटक्या जमाती (NT-A) | 10% |
| भटक्या जमाती (NT-B) | 3% |
| भटक्या जमाती (NT-C) | 11% |
| भटक्या जमाती (NT-D) | 6% |
| विशेष मागास (SBC) | 6% |
आवश्यक कागदपत्रे
- अर्जाची प्रिंट
- शेवटचे उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड
अर्ज प्रक्रिया
- mahajyoti.org.in या वेबसाइटला भेट द्या, ‘Notice Board’ वरून ‘UPSC प्रशिक्षण’ लिंक वर क्लिक करा.
- ऑनलाइन अर्ज भरा आणि प्रिंट घ्या.
- सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कार्यालयात सादर करा.
- अर्जाची अंतिम तारीख: 13 सप्टेंबर 2025
संपर्क व अधिक माहिती
Website: mahajyoti.org.in
Email: mahajyoti@gmail.com
यांच्याही बद्दल वाचा
Posted on August 20, 2025 |
Category: सामाजिक योजना